वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 30. वावडी - अभंग १९८

वावडी - अभंग १९८

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086593 · अभंग क्र. १९८

198.
वावडी - अभंग १९८

अलक्ष केली वावडी । लक्षाचा दोर परवडी । उडविती बारा चौदा गडी । भरली ती गगनी उडी ॥१॥
भली चंग वावडी । दादांनो भली चंग वावडी ॥धृ.॥
औट हात सोडोनी दोरा । मध्ये कामटी लाविल्या बारा । आत्मास्थितीच्या चंग उबारा । वावडी उडती अंबरा ॥२॥
साहा चार मिळवोनी गडी । अठराजण सोडिती वावडी । एका जनार्दनी त्यांची जोडी । जनार्दनाचे पायी गोडी ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग