वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 72. आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२

आत्मस्थिति - अभंग १९

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086638 · अभंग क्र. १९०१

1901.
आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२

येउनी नरदेहा गमविलें आयुष्य । नाही हृषीकेश स्मरला मनी ॥१॥
मुखें नाही केले देवाचे स्मरण । ऐसा अधम जन जाहलो देवा ॥२॥
नाही ते ऐकलें कीर्तन संतांचे । कर्ण बधिर साचे जाहलें देवा ॥३॥
करे नाही केला दानधर्म कांही । ऐसा अपराधी पाही जाहलों देवा ॥४॥
चरणन चालती तीर्थयात्रेप्रती । ऐसा आत्मघाती जाहलों देवा ॥५॥
एका जनार्दनी संसारांचा छंद । नाही तो गोविंद आठविला ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग