वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 59. हरिहर ऐक्य - अभंग ९८९ ते १००७

अभेदावांचुन न कळे भक

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085648 · अभंग क्र. १००७

1007.
अभेदावांचुन न कळे भक्तीचें महिमान । साधितां दृढ साधन । विठ्ठलरुप न कळे ॥१॥
येथे पाहिजे विश्वास । दृढता आणि आस । मोक्षाचा सायास । येथे कांही नकोची ॥२॥
वर्ण भेद नको याती । नाम स्मरतां अहोरात्री । उभी विठ्ठलमूर्ति । तयापाशीं तिष्ठत ॥३॥
आशा मनिशा सांडा परतें । कामक्रोध मारा लाते । तेणेंचि सरतें । तुम्ही व्हाल त्रिलोकीं ॥४॥
दृढ धरा एक भाव । तेणे चरणी असे ठाव । एका जनार्दनी भेव । नाही मग काळाचे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग