वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 200. जनास उपदेश

जब हंस काया नवजाय सा

🙏 4. संत नामदेव · ABH-082305 · अभंग क्र. १९३१

1931.
जब हंस काया नवजाय सांडोनी | तव घेई ठाकोनि रामनाम ॥१॥
अंतकाळ वेळी तुझे नव्हे कोण्ही | मी माझे म्हणवूनि भुललासी ॥२॥
राहे निरंतर राधवाचे द्वारी | तेणे भवसागरी तरसी बापा ॥३॥
नवमास माये वाहिलासी उदरी | आस केली थोरी होसिल म्हणोनी ॥४॥
स्तनपान देऊनि मोहे प्रतिपाळी | तेहि अंतकाळी दूर ठाकी ॥५॥
सर्वस्व स्वामिणि म्हणवितसे कांता | तेहि केश देता रडतसे ॥६॥
म्हणे म्या मेल्याचे सुख नाही देखिले | तेणे तंव पाळिले अर्धे प्राणे ॥७॥
गाई घोडे म्हैसी आणिक त्या दासी | धन त्वा सायासी मेळविले ॥८॥
तुझिया धनाला नाही पार लेखा | एकलाचि मूर्खा जासी अंती ॥९॥
हातींच्या मुद्रिका कानींचे ते नग | करोनि लगबग काढिती वेगी ॥१०॥
अंगींची लुगडी काढोनिया घेती | तुज बांधोनिया नेती यमदूत ॥११॥
भूमिभार जाला म्हणती वेग करा | नातळती शरीरा इष्ट मित्र ॥१२॥
स्मशानी नेऊनि भडाग्नि देऊनि | येती परतोनी सकळ जन ॥१३॥
एकलेंचि येणे एकलेंचि जाणे | पहा दृढ ज्ञाने विचारोती ॥१४॥
पाप-पुण्य दोन्ही अंतींची सांगती | येरे ती राहती जेथिची तेथे ॥१५॥
ऐसा हा संसार माया वेष्टियला | म्हणोनि दुन्हाविला योगी जनी ॥१६॥
विष्णुदास नामा विनवितसे तुम्हा | झणी परब्रह्मा विसराल ॥१७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग