वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 240. वेसकर ३८९९

वेसकर ३८९९

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084780 · अभंग क्र. ३८९९

3899.
वेसकर ३८९९

जोहार मायबाप जोहार । सर्वशरीराचा कारभार । मी आहे नफर साचार । मीवेसकर आलो ॥१॥ मी निजानंदीचा रहिवाशी । धांवत आलो संतांपाशीं । सांगतो ते मानसी । दृढ धरा ॥२॥ माझे धनी मोठे थोर । त्यांचा मीआवडता फार । तेथील सारा कारभार । मीचकरितो ॥३॥ माया ही धन्याची राणी । इची संगतनका धरू कोणी । थोर थोरा पाडिले व्यसनीं ॥४॥ विश्वामित्र पाराशर । नारदादि ऋषीश्वर । ब्रह्माविष्णु शिव साचार ॥५॥ इंद्र चंद्र महामती । पाडिले विषयावर्ती । एका जनार्दनी धरा भक्ती । मी वेसकर आलो ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग