ॐकार सह मकार आदि अंत
498.
ॐकार सह मकार आदि अंत नाही जया । ते पुंडलिक भुलवोनि आणिले या ठायां ॥१॥
भुललें वो माय पुंडलिकांप्रीतीं । उभाचि राहे परी खेद न करी चित्ती ॥२॥
अथरा पुराणांसी वाडशास्त्रें वेदादती॥तो सांवळा श्रीकृष्ण उभा विटे पुंडलिकाचे भक्ति ॥३॥
वेद वेदांतरें मत मतांतरे न कळे श्रुती पै वेवादती । तोएका जनार्दनांचे ह्रुदयी सांवळा घेउनि बुंथी ॥४॥
