विश्वाकार ब्रह्म विस
205.
विश्वाकार ब्रह्म विस्तारले सर्व ।
पाहे तू सावेव ज्ञानामी ॥१॥
माया म्हणवोनी द्वैत का कल्पिसी ।
नसते जीवासी बंधन ते ॥२॥
सुतेविण वस्त्र काय ते होईल ।
घट तो नव्हेल मातीविण ॥३॥
बहेणि म्हणे सोन्याविण अलंकार ।
न घडे साचार जाण ऐसे ॥४॥
