वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

उभारिला हात । जगी जा

🙏 3. संत तुकाराम · ABH-079751 · अभंग क्र. ३९७८

3978.
उभारिला हात । जगी जाणविली मात ॥१॥
देव बैसले सिंहासनी । आल्या याचकासी पुरे धनी ॥धृपद॥
एकाच्या कैवाडे । उगवे बहुतांचे कोडे ॥२॥
दोही ठायी तुका । नाही पडो देत चुका ॥३॥

अर्थ :
हात उभारुन जगामध्ये मी ही गोष्ट सांगितली गेलेली आहे, की देव सिंहासनावर बसले आहेत आणि जो कोणी याचक त्यांच्याकडे येईल त्याची तृप्ती होत आहे. एका पुंडलिकामुळेच व पुंडलिकाच्या निर्धारामुळेच देव पंढरीत आले असून खूप जणांचे कोडे सुटले गेले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, देवाच्या ठिकाणी देवा सेवा करण्याच्या कर्तव्यात आणि भूतलावर लोकांना देवाची सेवा करण्यासाठी प्रवृत्त करण्यात मी माझे कर्तव्य करीत आहे दोन्ही ठिकाणी मी काहीच चूक घडू देत नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग