जीवेसाठी यत्नभाव । त
3979.
जीवेसाठी यत्नभाव । त्याची नांव बळकट ॥१॥
पैल तीरा जाता काही । संदेह नाही भवनदी ॥धृपद॥
विश्वासाची धन्य जाती । तेथे वस्ती देवाची ॥२॥
तुका म्हणे भोळियांचा । देव साचा अंकित ॥३॥
अर्थ :
प्रयत्न करण्यासाठी जीवावर उदार होऊन प्रयत्न करण्याची तयारी असावी त्याचेच नांव बळकट प्रयत्न असे आहे. बळकट प्रयत्न करण्याची तयारी असेल तर पैलतीराला म्हणजे भवनदीच्या पार जाता येते यात कोणत्याही प्रकारचा संदेह नाही. विश्वास ठेवणा-यांची जात धन्य आहे आणि तेथेच देवाची वस्ती नेहमी आहे असे समजावे. तुकाराम महाराज म्हणतात, भोळया भक्तांचा देव खरोखरच अंकित असतो.
