वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 3. ज्ञानकांड रुपके › ७, विरहिणी अभंग ८७६ ते ९१३

पाचा दमांचा घोंगडा न

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074665 · अभंग क्र. ८८०

880.
पाचा दमांचा घोंगडा नेसेन ।
उरली मोट ते मी जेवीन गे बाईये ॥१॥
कामारी कामारी कामारी होईन ।
या गोपाळाचे घर रिघेन गे बाईये ॥२॥
त्याचा उंबरा उसिसा करीन ।
वरी येरझार मी सारीन गे बाईये ॥३॥
निवृत्ति ज्ञानदेवा पुसशील वर्म ।
त्यासी कामीन पुरेन गे बाईये ॥४॥

अर्थ :
भगवद्प्राप्तीकरता तळमळ लागलेली विरहिणी म्हणते घोंगडा म्हणजे वस्त्र ज्या वस्त्राला पाच पैशाचीसुद्धा किंमत नाही असे जाडे भरडे नेसेन. आणि त्या परमात्म्याचे जे उच्छिष्ट राहील ते मी जेवण करीन. त्याचे एका दासीच्या दासीची दासी होईन. पण या गोपाळाच्या घरांत त्याच्या प्राप्तीकरता शिरेन. त्याच्या घरांत मला शरीरभोगाची इच्छा नाही. त्याचे दारांत मी पडून राहीन. त्याच्या दाराचा उंबरा मी उशास घेईन. इतके कष्ट मी करीन पण मी माझी जन्ममरणरूपी येरझार मात्र चुकवीन. याचे वर्म निवृत्तीरायांनी ज्ञानदेवास विचारले तर त्यांची दासी होऊन मी सुद्धा उत्तर देण्यास पुरेन. असे माऊली ज्ञानदेव
सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग