माझिया मने धरिला विश
925.
माझिया मने धरिला विश्वास ।
तुमच्या नामी घातली कास ।
नाही उपेक्षा आणि आळस ।
तुमच्या ठायी शरणांगत ॥१॥
बहुता सांभाळिले देवा ।
केला बहुतांचा कुडावा ।
बहुता दाने वाढल्या सेवा ।
बहुता स्थपिले निजपदी ॥२॥
बहुती गाईले तुम्हा गीती ।
बहुती स्तपिले तुम्हा स्तुती ।
बहुता ध्यानी तुमची मूर्ती ।
आलिंगिली हदयात ॥३॥
बहुती तुम्हा आराधिले ।
बहुती पूजनी तुम्हा पूजिले ।
बहुती यज्ञावदानी याजिले ।
बहुती पाहिले ज्ञानदृष्टी ॥४॥
बहुती वेदस्तवनमिसे ।
तुमते कवळिले मानसे ।
बहुती योगादि सायासे ।
लाविले पिसे आपणीया ॥५॥
तुम्ही पुरलेती त्यांचीया भावा ।
सर्वज्ञपणे जी व्यापक देवा ।
घेऊनिया सेवा आपुलिया गावा ।
नेले केशवा निजवस्ती ॥६॥
ऐशी ऐकोनिया संतवाणी ।
मिठी विश्वासे घातली चरणी ।
निळा म्हणे माझी आरुषवाणी ।
लावावी गुणी आपुलिये ॥७॥
