परेसी परते स्वरूप या
107.
परेसी परते स्वरूप या हरिचे ।
भक्तिमार्ग साचे विरूढे रूप ॥
चला जाऊ पाहू आत्मराज घटी ।
नामे नेतु तटी वैकुंठीचिया ॥
समाधि विधान हरिपाठगुण ।
उगियाची मौन असिजे रया ॥
ज्ञानदेव निवृत्ति पुसो जाय भाव ।
तव तेणे स्वयमेव दाविले डोळा ॥
अर्थ :
भक्ती मार्गाने गेले की परे हुन परते असणारे हरिस्वरुप निश्चयांने स्पष्ट दिसते. त्या जीवरुप घटात पाहिले की ते नाम पैलतीराचे वैकुंठच देते. त्या समाधी सौख्याची प्राप्ती करण्यासाठी निवांत मौन ठेऊन हरिस्मरण करत बसा. मी श्री गुरु निवृत्तिनाथांना हरिप्रातीचे उपाय विचारला तेंव्हा त्यांना हा नामाचा मार्ग माझ्या डोळ्यांना दाखवला असे माऊली सांगतात.
