वर्णाची ते थोरी एका
207.
वर्णाची ते थोरी एका विठ्ठलाची । कीर्ती मानवाची सांगो नये ॥१॥
उदंडचि जाले जन्मोनिया मेले । होऊनिया गेले राव रंक ॥२॥
त्यांचे नाम कोणी न घे चराचरी । सहा वेद चारी वर्णिताती ॥३॥
अक्षय अढळ चळेना ढळेना । तया नारायणा ध्यात जावे ॥४॥
तुका म, हाणे तुम्ही विठ्ठल चिंती ध्याता । जन्ममरण व्यथा दूर होती ॥५॥
