फुगडी घालिता नव्हे त
589.
फुगडी घालिता नव्हे तुझा संग ।
जोवरी आहे देही तुझ्या विषयाचा रंग ।
कामक्रोधलोभे यांचा नाही जव त्याग ।
तोवरी वाया अवघे फुगडीचे सोंग ॥१॥
फुगडी घे विवेक धरी गे ।
पाहे परतोनी मागे ।
मग तूची हरी गे॥धृ॥
अहंकार दंभ मान दह्रू नको बाई ।
लोक-लाज भीड यासी देसवटा देई ।
कायावाचामनबुद्धि एकवटे होई ।
फुगडी घालिता मग देव तूचि पाही ॥२॥
परनिंदा द्वेष याचा नको करू साठा ।
धन विद्या पुत्र यांचा धरू नको ताठा ।
अवघे मोडूनि धरी एकभाव निष्ठा ।
बहिणी म्हणे तरीच तुज भेटी भगवंता ॥३॥
