वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

फुगडी फू । घडी हो ।

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075972 · अभंग क्र. ५९०

590.
फुगडी फू । घडी हो ।
न होसी उघडी ।
तर मग धगडी तू॥धृ॥ भूमिवरी झाडी ।
अंतरीचा कामक्रोध काढी ।
सांडी माया ओढी ।
मग होय भावा गडी ॥१॥
या वासनेचे ओचे ।
खोवी आधी साचे ।
निरोध इंद्रियांते ।
मग हरिरंगी नाचे ॥२॥
दोही पदावरी ।
एक भाव करी ।
अशिपदीवरी ।
मग तूच पाहे हरी ॥३॥
बद्ध सबळ भुजा ।
आधी सारी ओजा ।
जाण निजगुजा ।
मग फुगडी घाली ओजा ॥४॥
दृश्य भाव सांडी ।
एक भाव जोडी ।
प्रेमे घाली फुगडी ।
स्वानंदाची गोडी ॥५॥
ऐसी बहिणी फुगडी घाली ।
अवघ्या आणिल्या हारी ।
पांगविल्या पोरी ।
न येती बरोबरी ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग