वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ९, श्री विठ्ठल प्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७५९ ते ७९०

एकतत्त्व साधी तव हार

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074271 · अभंग क्र. ७७३

773.
एकतत्त्व साधी तव हारपलो तेथ ।
मज पाहता येथ मी नाही ॥१॥
काय करू सांगा कैसा हा आकळे ।
एकतत्त्वी मिळे हृदयी गे बाई ये ॥२॥
संपादनी नट नटोनिया हरि ।
एकरूपे करी आपण्या ऐसे ॥३॥
ज्ञानदेवी चित्त तत्त्वसार हरि ।
चित्तानुलहरी झेपावली ॥४॥

अर्थ :
मी एकतत्त्व सिद्ध करू गेले तो तेथे माझा मीपणाच हरपून गेले याला काय करू सांगा? हा परमात्मा कसा आकलन होईल? मला वाटते माझे हृदयांतच एकत्वाने तो आहे. हा नटधारी श्रीहरि अनंतरूपाने नटून त्या रूपाने संपादनी करतो, आणि पहाणायास आपल्याप्रमाणेच एकरूप करतो. अनात्म तत्वातील सत्य सार जो परमात्मा श्रीहरि तो चित्तांत व्यापल्यानंतर चित्ताच्या अनंत लहरीप्रमाणे तो नटतो. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग