वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ९, श्री विठ्ठल प्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७५९ ते ७९०

हस्ती घोडे हरण सिंहा

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074257 · अभंग क्र. ७७२

772.
हस्ती घोडे हरण सिंहाडे ।
तैसे हे गुजराती लुगडे गे माये ॥१॥
पालव मिरवीत जाईन ।
शेला पदरी धरूनि राहीन ॥२॥
बापरखुमादेविवरू विठ्ठल सांवळा ।
तेणे मज माजिठा दिल्हा साउला ॥३॥

अर्थ :
एखाद्या पटावर म्हणजे वस्त्रावर हत्ती घोडे हरण सिंह इत्यादी चित्रे काढले तर तो पट जसा चित्रविचित्र रंगाचा दिसतो. त्याप्रमाणे परस्परांत न मिसळणाऱ्या पंचमहाभूताचे हे शरीररूपी गुजराथ्या सारखे लुगडे आहे. त्या शरीररूपी लुगड्याचा पदर धरून मी श्रीकृष्णाकडे मिरवीत जाईन. आणि त्याच्याठिकाणी असलेल्या भक्तीरूप शेल्याचा पदर धरून राहीन. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे सांवळे श्रीविठ्ठल त्यांनी मला हा चित्रविचित्र रंगाचा शरीररूपी शालू दिला आहे. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग