अनतांचे अनंत गुण । अ
570.
अनतांचे अनंत गुण । अपार पार हे लक्षण । तो समचरण ठेवुन । विटे उभा राहिला ॥१॥
करी दास्यत्व काळ । भक्तजनां प्रतिपाळ । उदार आणि स्नेहाळ । तो उभा भीवरे ॥२॥
धीर सर्वस्वे बळसागर । निद्रा करी शेषावर । लक्ष्मी समोर । तिष्ठत सर्वदा ॥३॥
खेळे कौतुके खेळ । तोडी भक्तांचे मायाजाळ । एका जनार्दनी कृपाळ । स्वामीं माझा विठ्ठल ॥४॥
