वेदें सांगितले पुराण
571.
वेदें सांगितले पुराणीं आनुवादलें । शास्त्र बोले बोलत पांगुळले ॥१॥
न कळेचि कोना शेषादिकां मती । कुंठिता निश्चितई राहियेल्या ॥२॥
श्रुती अनुवादती नेती नेति पार । तोचि सर्वेश्वर उभा विटे ॥३॥
एका जनार्दनी ठेवुनी कटी कर । उभा असे तीरीं भीवरेच्या ॥४॥
