दृश्य मिथ्या वाचा घे
438.
दृश्य मिथ्या वाचा घेवोनी अनुभव ।
मग तुझा देव तुजपासी ॥१॥
सद्गुरूचे पायी वोळगे सर्वस्वी ।
मग तुज विश्वी विश्वंभर ॥२॥
दृष्टि सत्य तेव्हा दृश्य होते सत्य ।
तुम्ही यथातथ्य शोध करा ॥३॥
बहेणि म्हणे वाचा वोसरली परा ।
दृश्यपणा थारा तेथ कैचा ॥४॥
