पुण्यवंत जीव भूमी पु
3368.
पुण्यवंत जीव भूमी पुण्य देश । श्रीहरीची विशेष भक्ति जेथे ॥१॥
जाणोनिया इंद्र पाठवी विमान । आणवी सुमनें कांतीयेची ॥२॥
देवाच्या पूजना सूमने न मिळतां । राय पाचारीत वनमाळा ॥३॥
सेवक म्हणती सायंकाळी कांही । दिसो येत नाही रात्रीमाजीं ॥४॥
रात्रीं जाग्रणा बैसली रक्षक । लाविला वृंतारक अग्नीकाष्ठी ॥५॥
सावधान ठायी जागती सर्वही । विमान ते समयी आले तेथे ॥६॥
तोडिली सुमने गुप्तरुपें त्यांनी । विमान तो तेथोनी न चलेची ॥७॥
एका जनार्दनी देवदूत कष्टीं । न चले त्यांची युक्ति काही केल्या ॥८॥
