उगवला दिन दूत ते धां
3369.
उगवला दिन दूत ते धांवती । सांगती रायाप्रती धरिले चोरी ॥१॥
उगवले कोटी भानुप्रभा तेवीं दिसे । येऊनिया पुसे राजा तेथे ॥२॥
इंद्रें पाठविले न्यावया सुमनें । तुम्ही पुण्यवंत जाण म्हणोनिया ॥३॥
धन्य ग्राम पुण्यवंत भूमी जन । आम्हांलागी विघ्न का हे आले ॥४॥
राहावया तुम्हा कोणते कारण । लागला धूम्र जाण वृंतारकाचा ॥५॥
एका जनार्दनी यासी उपाय । पतिव्रता होय एकादशी व्रतीं ॥६॥
