कांतीपुरीमाजी राजा र
3367.
कांतीपुरीमाजी राजा रुक्मांगद एकनिष्ठ शुध्द पुण्य गांठी ॥१॥
सहनशील दया मूर्तिमंत अंगी । न भंगे प्रसंगी सत्वधीर ॥२॥
न्यायनीती राज्य पाळी ब्राम्हणासी । मूर्तिमंत धर्मासी स्थापियेले ॥३॥
दीनाचें रक्षण साधूचें पूजन । संतांचे वचन मान्य सदा ॥४॥
एका जनार्दनी साधियेला नेम । परि काही कर्म वोढवले ॥५॥
