वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 18. महाशिवरात्री महात्म्य व अभंग › १. महाशिवरात्र अभंग

येऊनिया यम ठाकला पुढ

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072977 · अभंग क्र. ३०

30.
येऊनिया यम ठाकला पुढारी । पाहे दुराचारी दुरोनिया ॥१॥
घाबरला मनी कोण असे नेणे । विचारिता मनी भांबावला ॥२॥
पुसो लागे त्याला कोण तू आलासी । आणिक ह्मणसी माग कांही ॥३॥
देव किंवा यक्ष राक्षस किन्नर । करिता निर्धार न पडे ठायी ॥४॥
नामा ह्मणे मूर्ख पारधी तो खरा । दैव त्याच्या घरा आले जाण ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग