जळाले ते वस्त्र कैसे
217.
जळाले ते वस्त्र कैसे पांघरेल ।
देठी का जडेल पक्कपत्र ॥१॥
तैसे ज्ञानियाचे भासते शरीर ।
बाधील संसार केवी तया ॥२॥
जळातील सूर्य प्रकाशेल काई ।
चित्रीचा तो पाही अग्नि जाळी ॥३॥
बहेणि म्हणे देह-प्राक्तन तोवरी ।
विचार अंतरी निश्चयाचा ॥४॥
