भाजले ते बीज अंकुरेन
218.
भाजले ते बीज अंकुरेना कदा ।
न मिळेचि दुधामाजी लोणी ॥१॥
पैसा तो ज्ञानिया जन्म न घे जाण ।
वासना भाजून वर्ततसे ॥२॥
परिसासी लागता लोह पालटले ।
काळिमा हे भेटे पुन्हा कैसी ॥३॥
बहेणि म्हणे गोदा मिळाली सागरी ।
न येची माघारी त्र्यंबकाते ॥४॥
