वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

शरीराचे माथा वर्तते

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075962 · अभंग क्र. २१६

216.
शरीराचे माथा वर्तते प्राक्तन ।
शरीर ते जाण प्रकृतीचे ॥१॥
ज्ञानियांचे मत देहचि हा मिथ्या ।
प्राक्तनाची कथा तेथे कोण ॥२॥
प्राक्तन भोगवी भोग तो शरीरी ।
ज्ञानिया अंतरी सुखरूप ॥३॥
बहेणि म्हणे देह-प्राक्तन तोवरी ।
विचार अंतरी निश्चयाचा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग