षड्गुणसंपन्न पंढरीच्
523.
षड्गुणसंपन्न पंढरीच्या राया | आमुच्या स्वामिया केशिराजा ॥१॥
रामकृष्ण हरी श्रीधरा मुकुंदा | सज्जनी स्वानंदा सर्वातीता ॥२॥
गोविंदा गोपाळा गोपवेषधारी | गोवर्धन धरी नखावरी ॥३॥
दुष्ट दुर्जनाच्या दुखाविना चित्ता | पावन पतिता नामा म्हणे ॥४॥
