लेकुरे खेळतीं वो साच
2128.
लेकुरे खेळतीं वो साचे । मायबाप प्रेमे नाचे ॥१॥
तैसा हेत पांडुरंगीं । धरिता उणे काय जगी ॥२॥
जैसा जैसा छंद त्याचा । पुरवणे लागें साचा ॥३॥
एका जनार्दनाचा बाळ । कौतुके खेळतसें खेळ ॥४॥