वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ११, योग अभंग ३४२ ते ४४४

प्रणवच देह देह हा प्

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075174 · अभंग क्र. ३९९

399.
प्रणवच देह देह हा प्रणव ।
कल्पनेचा भाव कल्पू नये ॥१॥
अंजनाचे सार तेच देह बा रे ।
आत्मा परिपूर्ण सारे पाहाती ज्ञानी ॥२॥
ज्ञानदेव म्हणे प्रणव माझा पिता ।
अक्षर तेच माता याच भेदे ॥३॥

अर्थ :
ओंकाररुप प्रणव हाच देह व देह हाच प्रणव आहे. त्याच्या ठिकाणी भेदाची भावना करुच नये. ज्ञानी ज्ञानाच्या अंजनाने आत्मा सर्वत्र भरला आहे. असे पाहातात. तर मग देह तरी ज्ञानांजनाचे साररुप आत्म्याहून वेगळा कसा असणार. जो प्रणव तोच माझा पिता आहेत व तेच अक्षर माझी माता ही आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग