(वारकरी परत आल्या नं
3599.
(वारकरी परत आल्या नंतरचे अभंग)
काय पाठविले । सांगा भातुके विठ्ठले ॥१॥
आसे लागलासे जीव । काय केली माझी कीव ॥धृपद॥
फेडिले मुडतर । किंवा काही जरजर ॥२॥
तुका म्हणे सांगा । कैसे आर्त पांडुरंगा ॥३॥
अर्थ :
माझ्या विठ्ठलाने माझ्यासाठी कोणता खाऊ पाठवला आहे तो सांगा. माझा जीव खूप आशेला लागला आहे माझ्यावर विठ्ठलाने कोणत्या प्रकारची कीव केली आहे ते मला सांगा. देवाने माझा मूर्खपणा दु:ख नाहीसे केले की माझे पत्र वाचूनच तो जर्जर झाला ते मला सांगा. तुकाराम महाराज म्हणतात, हे पंढरीहून जाऊन आलेल्या माझ्या वारकऱ्यांनो तुम्ही पाडूरंगापुढे गेलात व माझा निरोप पाडूरंगाच्या पुढे दिलात त्यावेळी पाडूरंगाच्या मनात माझ्याविषयी कशा प्रकारची आर्त भावना तुम्हाला दिसून आली ते मला तुम्ही सांगा.
