(वारकरी परत आल्या नं
3598.
(वारकरी परत आल्या नंतरचे अभंग)
बोलिली ती काय । माझा बाप आणि माय ॥१॥
ऐसे सांगा जी झडकरी । तुह्मी सखे वारकरी ॥धृपद॥
पत्राचे वचन । काय दिले फिरावून ॥२॥
तुका म्हणे काही । मना आणिले की नाही ॥३॥
अर्थ :
हे माझ्या वारकऱ्यांनो तुम्ही पायी पंढरपूरला गेला होतात त्यावेळी माझे माय आणि बाप काय म्हणाले ? हे माझ्या सख्यांनो वारकऱ्यांनो माझे मायबाप काय म्हणाले ते तुम्ही मला लवकर सांगा. हे माझ्या वारकऱ्यांनो संतांनो मी तुमच्याजवळ पत्र दिले होते ते तुम्ही माझ्या मायबापाकडे दिल्यानंतर माझ्या पत्राचे त्यांनी फिरुन काय उत्तर दिले ? तुकाराम महाराज म्हणतात, माझे पत्र वाचून देवाने माझ्याविषयी काही मनात घेतले की नाही ?
