वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

खुंटले ते मन तोडियेल

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090118 · अभंग क्र. २०८

208.
खुंटले ते मन तोडियेली गति । वेळु तो पुढती मोडियला ॥१॥
जाहाले उन्मन विराले ते मन । श्रीरामचरण पुरे आम्हा ॥२॥
गेले मन रामी निष्काम कल्पना । बुडाली वासना तिये डोही ॥३॥
धन्य ते चरण नित्यता स्मरण । अखंडसंपन्न प्रेम देतु ॥४॥
अमृत कुपिका अमृताचा झरा । पटु येकसरा वाहातुसे ॥५॥
निवृत्तीची वृत्ति प्रेमेंचि डुल्लत । नमनेम निश्चित रामपायी ॥६॥

अर्थ:
आम्ही आत्मारामशी जोडलो गेल्याने मनाची धाव खुंटली त्याची गती निमाली व वेळेचे बंधन ही राहिले नाही.त्या श्रीराम चरणाला विनटल्यापासुन मन उन्मन झाले. मनात राम बसल्यावर कल्पना निष्काम झाली व वा़सना ठायीच बुडुन गेली. त्या रामचरणाचे नित्य स्मरण केल्याने धन्यता मिळाली व अखंड प्रेमाचा झरा हृदयात वाहु लागला. रामनामामुळे अमृताची कुपीका हाती आली व तो अमृत झरा प्रेमपाटातुन सतत वाहता झाला.निवृत्तिनाथ म्हणतात मी रामनामाच्या मुळे प्रेमाने डुल्लत आहे त्यामुळे त्या श्रीराम पायावर मी विनटलो आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग