वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

व्योमामाजि तारा असंख

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-089978 · अभंग क्र. २०७

207.
व्योमामाजि तारा असंख्य लोपति । तैसे लक्ष्मीपती माजी विरो ॥१॥
धन्य दिवस नित्य सेवू श्रीरामास । जनवनसमरस पूर्णबोधे ॥२॥
तारा ग्रह दि त्या माजि उन्मन । प्रपंचाचे भान दुरी ठेले ॥३॥
निवृत्ति निमग्न नाम सेविताहे । ब्रह्मपण होय सदोदीत ॥४॥

अर्थ:
अवकाशात निखऴलेला तारा जसा लुप्त होतो तसे सर्व काही त्या हरिरुपात लोप पावते. जसा जसा तो श्रीराम अंतःकरणात नामरुपाने स्थापित झाला की सर्व जन वन समरस असल्याचा बोध होतो. तसे केल्याने प्रपंचाचे भानच राहात नाही. जसे दिवसा तारे सुर्य प्रकाशामुळे दिसत नाहीत. निवृत्तिनाथ म्हणतात, मी सतत नामचिंतनात निमग्न असल्यामुळे सतत ब्रह्मपणाचे सुख सेवन करत आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग