वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

नहो नरनारी संवसारी अ

🙏 3. संत तुकाराम · ABH-079733 · अभंग क्र. ३९६७

3967.
नहो नरनारी संवसारी अंतरलो । निर्लज्ज निष्काम जना वेगळेंचि ठेलो ॥१॥
चाल रघुरामा ने आपल्या गांवा । तुजविण आम्हा कोण सोयरा सांगाती ॥धृपद॥
जनवाद लोकनिंद्य पिशुनाचे चेरे । साहू तुजसाठी अंतरली सहोदरे ॥२॥
बहुता पाठी निरोप हाटी पाठविला तुज । तुका म्हणे आता सांडुनि लौकिकाचि लाज ॥३॥

अर्थ :
आम्ही संसारापासून अंतरलो आहोत त्यामुळे आम्ही नरही नाहीत आणि नारीही नाहीत निष्काम, निर्लज्ज होऊन आम्ही सर्व लोकापेक्षा वेगळे होऊन राहिलो आहोत. हे रघुरामा चल तू आम्हाला तुझ्या गावाला घेऊन जा तुझ्यावाचून आम्हाला कोण सोयरा आणि सोबती आहे. देवा तुझ्यासाठी आम्ही लोकवाद, लोकनिंदा व नीच लोकांचे, आम्हाला टाकून बोलणे हे सर्व सहन करत आहोत जेव्हापासून आम्ही तुझी भक्ति करत आहोत तेव्हापासून आम्हाला सर्व सहोदरे म्हणजे भाऊ, बहीण अंतरले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आम्ही आता लोकलौकिकाची लाज सोडून संतांबरोबर तुझ्या आषाढी, कातिर्कीच्या बाजारहाटामध्येच म्हणजे आम्हाला तू निजधामाला घेऊन जा, असा आम्ही संतांकडे खूप वेळा निरोप पाठविला आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग