(सौरी, स्वैरिणी)
3966.
(सौरी, स्वैरिणी)
सम सपाट वेसनकाट निःसंग झाले सौरी । कुडपीयेला देश आता येऊ नेदी दुसरी ॥१॥
गाऊ रघुरामा हेचि उरले आम्हा । नाही जीवतमा वित्तगोतासहीत ॥धृपद॥
ठाव झाला रिता झाकुनि काय आता । कोणासवे लाज कोण दुजे पाहता ॥२॥
सौरीयांचा संग आम्हा दुरावले जग । भिन्न झाले सुख देहभाव पालटला रंग ॥३॥
लाज भय झणी नाही तजियेली दोन्ही । फिराविला वेष नव्हो कोणाचींच कोणी ॥४॥
तुका म्हणे हा आम्हा वेष दिला जेणे । जनाप्रतित सवे असो एकपणे ॥५॥
अर्थ :
सर्व जागा समसमान असून मी सर्वत्र हरीरुपच पाहात आहे सर्व व्यसनाचा त्याग करुन मी नि:संग सौरी म्हणजे स्वैरीनी झाले आहे. सर्व देश हे ब्रम्हस्वरुप असून आता व्दैतच राहिले नसून मी दुसरे कोणालाही येऊ देणार नाही. आमच्यासाठी आता काही उरले नाही एका रघुरामाचे नाम आम्ही गाऊ आता आमच्यासाठी वित्त, गोतच्या सहीत आमचा जीवाची देखील तमा, पर्वा आम्हाला राहिलेली नाही. आता मला माहित झाले आहे की हा देह रिकामा झाला आहे मग याला वस्त्राने झाकून तरी काय होणार आहे आता वस्तुत: पाहिले तर सर्व जगच देवरुप झाले आहे त्यामुळे लाज तरी कोणाची धरावी. आता आम्ही संतरुपी सौरांचा संग केला आहे त्यामुळे सर्व जग आम्हाला दुरावले आहे आणि जगापेक्षा वेगळया प्रकारचे सुख आम्हाला झाले असून आमचा देहभाव, आमचा रंग पालटला आहे. आता आमच्या ठिकाणी लाज आणि भय राहिलीच नाही लोकांविषयी लाज आणि भय आमच्या ठिकाणी राहिली नसून आम्ही दोन्ही गोष्टीचा त्याग केला आहे पूर्वी आमचा जो वेश होता तो म्हणजे देहभावाचा त्याचा त्याग करुन आम्ही ब्रम्ह नावाचा वेश परिधान केला आहे त्यामुळे आत
