आणिक हे ग्रंथ प्रमाण
9.
आणिक हे ग्रंथ प्रमाण अष्टोतरशें ।
वदिले स्वरसे गुरुकृपे ॥१॥
रामायण अदभुत सप्तकांड साचार ।
तव प्रयाण विचार आरंभिला ॥२॥
समाधि सुखाचा सोहळा अपार ।
होता जयजयकार प्रतिष्ठानी ॥३॥
निळा म्हणे ऐसा ब्रम्हानंद झाला ।
आंनदी लोटला आनंदचि ॥४॥
