नाशवंत देता ब्रह्म य
1413.
नाशवंत देता ब्रह्म येईल हाता | ऐसी ज्याची कथा पुराणांत ॥१॥
सद्गुरूचे पायी देहासि अर्पिता | तात्काळ मुक्तता हाता येते ॥२॥
माया देऊनिया ब्रह्म घ्यावे हाती | ऐशा गुरूप्रति का भजाना ॥३॥
नामा म्हणे गुरूपाय लाभ आहे | मोक्ष तोही पाहे दास होतो ॥४॥
