सद्गुरूसारिखा सोइरा
14011.
सद्गुरूसारिखा सोइरा जीवलग ।तोडिला उद्वेग संसारींचा ॥ १ ॥
काय उतराईहोऊ कवण्या गुणे । जन्मा नाही येणे ऐसेंकेले ॥ २ ॥
माझे सुख मज दाखविले डोळा । दिधलीप्रेमकळा नाममुद्रा ॥ ३ ॥
डोळियाचा डोळाउघडिला जेणे । लेवाविले लेणे आनंदाचे ॥ ४ ॥
नामा म्हणे निकी सांपडली सोय । न विसंबेंपाय खेचराचे ॥ ५ ॥
