वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ६. काला

गोधने घेउनी गोपाळ आल

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089686 · अभंग क्र. २२०

220.
गोधने घेउनी गोपाळ आले ।
छायेसी बैसले कळंबाचिये ॥१॥
आता म्हणे मांडा खेळ ।
गोमटी हे वेळ सांपडली ॥२॥
तव कृष्ण म्हणती आधी जेवा ।
रुचेल बरवा खेळ मग ॥३॥
पोटात भुक सुकले मुख ।
कोण ते सुख खेळायाचे ॥४॥
कोणा कैसा पाहोंदया दिठी ।
यारे सोडा गाठी शिदोरियाच्या ॥५॥
सोडिता सिदोया दाविती अवघे ।
तव एका ऐशी नव्हे एकापरी ॥६॥
अरुष एक ते बोलताती बोल ।
परी अर्थ सखोल विचारता ॥७॥
आधी माझा घास भरी ।
मग मी श्रीहरी घेईन तुझा ॥८॥
कान्हा म्हणे ऐका रे वोजा ।
आधी तुम्ही माझा घास भरा ॥९॥
गोपाळ म्हणती शेवट गोड ।
पुरवी आधी कोड आमुचा घेई ॥१०॥
घाटा घुगया कोरडया भाकरी ।
एकाची शिदोरी शिळीपाकी ॥११॥
कढण काला कालविले ताक ।
एकाचा साजूक दहींभात ॥१२॥
एक ते म्हणती आमुचे अंगिकारी ।
मुखी घास भरी टाकू नको ॥१३॥
चांगले कोणाचे आणावे गोपाळा ।
आमुचा हा दुबळा संसार ॥१४॥
तव कान्हा म्हणे आईका रे गडे ।
तुमचेचि आवडे घाला मुखी ॥१५॥
तुमचीये हातीचे भाजीदेठपान ।
ते आम्हा समान पंचामृता ॥१६॥
आणखी अर्पिती उपाधी जाणिवा ।
विकृती त्यांचिया भावा देखोनि मज ॥१७॥
सर्व भावे आम्हा हेचि गोड लागे ।
दांभिका न लगे भेदकांचे ॥१८॥
मिटक्या देऊनिया स्वीकारी श्रीरंग ।
मग म्हणे विभाग घ्यावा रे माझा ॥१९॥
ब्रम्हरस वरि नामाचे सिंचन ।
सेवा रे सज्जन सखे माझे ॥२०॥
जेऊनिया धाले गोविंदा पंगती ।
उध्दार ते देती स्वानुभवे ॥२१॥
धन्य तो सोहळा आनंदाचा खेळ ।
निळा म्हणे गोपाळ सांगती ज्या ॥२२॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग