तुझे नित्य सुख ध्याव
1749.
तुझे नित्य सुख ध्यावे येणे मनें| असावे अनुसंधाने चरणाचेनि ॥१॥
वासनेविरहित होऊनि एकवट| असावे निकट संतसंगे ॥२॥
ऐशी मज कृपा करी गा विठ्ठला | म्हणविती आपुला दास जगी ॥३॥
श्रवणी तुझे नाम ऐकावे आवडी | चित्ते देऊनि बुडी प्रेमडोही ॥४॥
नयनी तुझे रूप देखावे सर्वत्र| व्हावे भूतमात्र सखे माझे ॥५॥
वदनी तुझे नाम गावे निर्विकल्प | धरोनि तुझे रूप हृदयकमळी ॥ ६ |
काया संताचरणी जावी लोटांगणीं| ते भाग्य अनुदिनी देई बापा ॥७॥
हेंचि माझे व्रत हेंचि तपतीर्थ| करावे दास्यत्व संतांचे हे ॥८॥
अनुदिनी व्हावा संताचा हा संग| असावा अनुराग कीर्तनाचा ॥ ९|
मनाचा मज त्रास अपमानी उल्हास| देई तुझा ध्यास सर्वकाळ ॥१०॥
नामा म्हणे विठोबा तरीच शरणागत| नाही तरी पतित म्हणति मज ॥११॥
