काय द्याल तुम्ही देव
658.
काय द्याल तुम्ही देवा ।
घ्यावी सेवा आमुचीच ॥१॥
पूवीपासूनि करीत आलो ।
कळासलो अभ्यासे ॥२॥
दयाल ते ते अवघे मिथ्या ।
आम्ही सत्या न संडू ॥३॥
निळा म्हणे जीवन आम्हा ।
पुरुषोत्तमा दास्यत्व ॥४॥
658.
काय द्याल तुम्ही देवा ।
घ्यावी सेवा आमुचीच ॥१॥
पूवीपासूनि करीत आलो ।
कळासलो अभ्यासे ॥२॥
दयाल ते ते अवघे मिथ्या ।
आम्ही सत्या न संडू ॥३॥
निळा म्हणे जीवन आम्हा ।
पुरुषोत्तमा दास्यत्व ॥४॥