वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 62. वणवा

वणवा

🙏 4. संत नामदेव · ABH-083667 · अभंग क्र. १२१

121.
वणवा

झाला अस्तमान तेथेंचि रहाती । ऐके परीक्षिती अद्‍भुत हे ॥१॥
निद्रेने व्यापिले शौनकारे सर्वा । लागला वणवा तया स्थानी ॥२॥
गायी पाळताती पक्षी उडताती । पिली पडताती कृष्णापुढे ॥३॥
हाहा:कार झाला धांव धांव कृष्णा । वांचवी रे प्राणा सकळांच्या ॥४॥
तुझी आह्मी बाळे वाचवींरे आह्मा । धांव धांव रामा ह्मणताती ॥५॥
आक्रोशे रडती मारिताती हांका । वैकुं-ठनायका रक्षी आह्मा ॥६॥
दीनाच दयाळ मनाचा कोवळा । घाली अभिज्वाळा मुखामाजी ॥७॥
होता प्रात: काळ सकळ चालिले नामा ह्मणे आले गोकुळांशी ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग