अविश्वासापुढें । परम
3217.
अविश्वासापुढें । परमार्थ कायसे बापुडे ॥१॥
अविश्वासाची राशी । अभिमान येतसे भेटीसी ॥२॥
सदा पोटी जो अविश्वासासी । तोचि देखे गुणदोषासी ॥३॥
सकळ दोषा मुकुटमणी । अविश्वास तोचि जनी ॥४॥
एका जनार्दनी विश्वास । नाही त्यास भय कांही ॥५॥
