परमार्थ सोयरा अहोरात
3218.
परमार्थ सोयरा अहोरात्र करी । गाई निरंतरी रामकृष्ण ॥१॥
नरदेहा यातना चुकतील फेरे । वाया हावभरी होऊं नको ॥२॥
रात्रंदिवस करी नामाचाचि पाठ । मोक्षमार्ग फुकट प्राप्त होय ॥३॥
एका जनार्दनी नामापरतें सार । न करी विचार आन दुजा ॥४॥
