जपी तपी वृत्ती मौन्य
524.
जपी तपी वृत्ती मौन्य अनुष्ठानी ।
साधिली पंचाग्नि धूम्रपान ॥१॥
ऐसे नाना क्लेश पीडिती शरीर ।
परि निर्विकार चित्त नोव्हे ॥२॥
वायो साधुनिया निरोधिती प्राण ।
षड्चक्र भेदून आसनी ते ॥३॥
बहेणि म्हणे शुष्क शरीर करोनी ।
एक पर्णाशनी निराहारी ॥४॥
