वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 62. हरिनाममहिमा - अभंग १०७१ ते १११९

हरिनामें तरले । पशुप

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084934 · अभंग क्र. १०७९

1079.
हरिनामें तरले । पशुपक्षी उद्धरले ॥१॥
ऐशी व्याख्या वेदशास्त्री । पुराणे सांगताती वक्त्री ॥२॥
नामे प्रल्हाद तरला । उपमन्यु अढळपदी बैसला ॥३॥
नामे तरली ती शिळा । तारियेला वानरमेळा ॥४॥
हनुमंत ज्ञानी नामे । गणिका निजधामीं नामे ॥५॥
नामे पावन वाल्मिक । नामे अजामेळ शुद्ध देख ॥६॥
नामे चोखामेळा केला पावन । नामे कबीर कमाल तरले जाण ॥७॥
नामे उंच नीच तारिले । एका जनार्दनी नाम बोले ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग