वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

संतासी सुखदुःख सारिख

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076217 · अभंग क्र. ६९५

695.
संतासी सुखदुःख सारिखेचि भासे ।
तो संत निःशेषे जाणिजेसु ॥१॥
येराची अवघी जाण चित्रकथा ।
जोवरी नाही चित्ता अनुताप ॥२॥
वादनिंदाभेद जो राहे गिळोनी ।
तो एक संतजन मिरवे देखा ॥३॥
कामक्रोधहिंसा नये ज्याच्या चित्ता ।
तो संत तत्त्वता एक होय ॥४॥
आशा मनसा तृष्णा कल्पना विघरे ।
तो संत साचारे जाणा तुम्ही ॥५॥
बहिणी म्हणे जीवे जिता ना मेलासा ।
संतत्वाची दशा जाणिजे ते ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग