नलगे संपादनी द्यावा
696.
नलगे संपादनी द्यावा परिहार ।
अंतरी अंतर जाणवते ॥१॥
घराची ते वोज दाखवी आंगण ।
कळे ते आपण क्रिया तैसी ॥२॥
न लगे ते झाकावे न लगे ते लोपावे ।
कळते अवघे अंतरसाक्षी ॥३॥
बहिणी म्हणे सीत पहावे चेपोनी ।
अवघे घोटोनी काय काज ॥४॥
