जयाचिया अंगी सकळ त्य
574.
जयाचिया अंगी सकळ त्या कळा । तो परब्रह्मा पुतळा पंढरीये ॥१॥
वेदांती सिद्धांती थकले धादांती । परी एकाचीही मती चालेचिना ॥२॥
वानितां वानितां जाहलासे तल्पक । सहस्त्र मुखी देख मौनावला ॥३॥
एक मुखें वानु किती मी पामर । एका जनार्दनी साचार न कळेची ॥४॥
